आपली सततची बदलती लाईफस्टाईल सर्वात जास्त परिणाम करते ती आपल्या शरीरावर. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आता वेगवेगळ्या डाएटिंगचा आधार घेतला जातो. डाएटिंगच्या नावावर आता वेगन, किटो डाएट अशी वेगवेगळी डाएट आपण ऐकली आहेत आणि आपल्यापैकी काही जण हे डाएट फॉलोदेखील करत असतील. पण असंच एक डाएट आहे ज्यामुळे तुमचे वाढते वजन, भूक आणि मेटाबॉलिजम हे नियंत्रणात राहील.
या डाएटचं नाव आहे गोलो डाएट. आपल्यापैकी काही जणांना याबद्दल ऐकलं असेल तर काही जणांना याबद्दल कोणतीही माहिती नसेल. तर हे गोलो डाएट आपल्याला केवळ शारीरिक नाही तर मेंदूच्या तंदुरुस्तीसाठीही फायदेशीर ठरते. गोलो डाएटमध्ये तुम्ही कॅलरी नियंत्रित करून शरीरातील मेटाबॉलिजम धिक चागले करण्यासाठी फायदा करून घेऊ शकता.
यामुळे तुमच्या वाढत्या वजनावर नियंत्रण येईल आणि त्याशिवाय तुमची भूकही नियंत्रणात राहील. मेटोबॉलिजम नीट असेल तर वजन वाढ होण्याचा त्रास होत नाही. वजन कमी करत,
असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेटाबॉलिजमवर लक्ष देणं. गोलो डाएटमध्ये यावर जास्त लक्ष देण्यात आले आहे. पण बऱ्याच जणांना अजूनही या डाएटविषयी जास्त माहिती नाही. त्यामुळे त्याआधी गोलो डाएट म्हणजे नेमकं काय आहे हे आपण जाणून घेऊया. गोलो डाएटविषयी सर्व माहिती आम्ही तुम्हाला लेखातून देणार आहोत.
गोलो डाएटचे फायदे:-
गोलो डाएट हे पोषक तत्वांवर आधारित आहे आणि साखरेवर नियंत्रण आणि वजन आटोक्यात आणण्याासाठी याचा फायदा होतो. तुमचं पोषक तत्वाच्या बाबतीत जर ज्ञान कमी असेल तर हे डाएट करणं तुम्हाला योग्य आहे. कारण यामध्ये तुम्हाला योग्य आणि संतुलित आहार खावा लागतो. तसंच 1-2 भागांमध्ये कार्ब्स, प्रोटीन्स, फॅट्स आणि भाज्या या सगळ्याचा समावेश तुमच्या जेवणात करणं गरजेचं आहे.
त्यामुळे तुमचं खाण्यावरही नियंत्रण येतं आणि तुमची भूक नियंत्रणात राहून तुम्ही खाल्लेलं ताजं अन्न हे तुमच्या शरीराला योग्य प्रमाणात लागतं. त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये चरबी साठत नाही.
गोलो डाएटचा हा सर्वात मोठा फायदा आहे. भूक कमी झाल्याने वजनवार आपोआपच नियंत्रण येते. गोलो डाएटमध्ये भूकेवर योग्य प्रकारे नियंत्रण कसे ठेवयाचे यावर भर देण्यात येतो. त्यामुळे त्याचे सेवन नक्की कसे करायचे हेदेखील आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत.
आठवडाभर तुम्ही हा डाएट प्लॅन कसा फॉलो करायचा आहे जेणेकरून तुमचे वजन वाढणार नाही आणि त्याशिवाय तुमचे मेटाबॉलिजमही व्यवस्थित राखले जाईल हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
गोलो डाएट म्हणजे काय:-
गोलो डाएट हे वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे मिश्रण आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल म्हणजे नेमकं काय? तर यामध्ये मांस, भाज्या आणि त्या फळांचा समावेश केला जातो जे बाजारामध्ये अगदी सहजरित्या उपलब्ध आहेत. या डाएटमध्ये तुम्हाला प्रोटीन, कार्ब्स, फॅट या सगळ्याचा समावेश करून घ्यावा लागतो. तुम्हाला अशा प्रकारचे हे गोलो डाएट फॉलो करायचे असते ज्यामध्ये तुमच्या शरीरातील साखर स्थिर राहील आणि तुमची भूकही चाळवणार नाही.
उदाहरणार्थ तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये दोन अंडी (प्रोटीनचे दोन युनिट्स), एक टोस्ट (कार्बचे एक युनिट), लोणी (फॅटचे एक युनिट) आणि हंगामी एखादे फळ (कार्बचे दुसरे युनिट) अशा गोष्टी खाऊ शकता.
तुम्हाला या गोष्टींचा समावेश आपल्या रोजच्या आहारात करून घ्यायचा आहे. एकंदरीतच तुम्हाला तुमच्या शरीरामधील वजन आटोक्यात आणण्यासाठी योग्य आहाराचा समावेश करून घ्यायचा आहे. यालाच गोलो डाएट असं म्हणतात. वजन कमी करत असतानाही साखरेची पातळी व्यवस्थित राखण्याचं आणि हार्मोनल बॅलेन्स योग्य ठेवण्याचं काम गोलो डाएट करतं. तसंच जास्तीत जास्त निरोगी आहार घेण्यावर या डाएटमध्ये भर देण्यात आला आहे.
शरीरावर काय होतो गोलो डाएटचा परिणाम:-
गोलो डाएटमध्ये इन्शुलिन आणि रक्तप्रवाह व्यवस्थित राहून तुमची भूक, वजन आणि मेटाबॉलिजम व्यवस्थित राखण्यावर भर देण्यात येतो. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर जेव्हा इन्शुलिन आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचं काम करत नाही तेव्हा साखर आपल्या रक्तामध्ये तशीच राहाते आणि त्यामुळेच आपल्या शरीरामध्ये चरबी वाढू लागते,
आणि त्यामुळे वजनही वाढू लागतं. या गोलो डाएटमुळे रक्तामधील साखर आणि इन्शुलिनची पातळी योग्य राखण्याकडे अधिक लक्ष दिले जाते. यामुळे आपल्या शरीरामधील ऊर्जेचा योग्य उपयोग होतो. त्यामुळे त्याचा शरीरावर कोणताही वाईट परिणाम न होता, काही कालावधीनंतर तुम्हाला चांगला परिणामच दिसून येतो.
वजन कमी करण्यासाठी उपयोग होतो का:-
योग्य रितीने हे गोलो डाएट तुम्ही फॉलो केले तर याचा नक्कीच वजन कमी करण्यासाठी उपयोग होतो. 26 आठवड्यांसाठी केलेल्या अभ्यासामध्ये गोलो डाएटचा वजन कमी करण्यासाठी उपयोग होतो हे सिद्ध करण्यात आले आहे. साधारणतः 14 किलो वजन या कालावधीमध्ये कमी झाल्याचेही सांगण्यात आले आहे.
हे अजूनही जास्त प्रमाणात प्रसिद्ध झालेले नाही. पण हे परिणामकारक असल्याचे सांगण्यात येत आहे. आपल्या रोजच्या आयुष्यात काही महत्त्वाचे बदल केले आणि योग्य निरोगी आहार घेतला तर याचा उत्कृष्ट परिणाम होऊन वजन कमी करण्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल.
गोलो डाएटमध्ये कोणत्या पदार्थांचा करावा समावेश:-
गोलो डाएटमध्ये तुम्ही प्रोटीन, कार्ब्स आणि भाज्या यांचा अधिक समावेश करून घ्यायला हवा. तुम्ही पॅकेट फूड, साखर, अन्य प्रकारचे गोड पदार्थ, प्रोसेस्ड फूड या सगळ्याचा आपल्या रोजच्या खाण्यातून समावेश काढून टाकायला हवा. नेहमीच्या जेवणात तुम्ही चिकन, मासे, डेअरी फूड, सुका मेवा, अंडी, डाळ, हिरव्या भाज्या, फळं, बाजारात लवकर उपलब्ध होणाऱ्या भाज्या यासारख्या सगळ्या पदार्थांचा वापर करून घ्या.
तसंच तुम्ही स्टार्चसाठी बटाटा, पालेभाज्या आणि प्रत्येक दिवशी किमान एक फळ याचा समावेश या गोलो डाएटमध्ये करून घेऊ शकता. यामुळे तुमची भूकही मिटेल आणि वजनही वाढणार नाही. तसंच सहसा ब्रेड आणि इतर बाहेरील तेलकट पदार्थ खाणं तुम्ही टाळा. घरातील जास्तीत जास्त ताजे पदार्थ खाण्यावर तुम्ही भर द्यायला हवा. त्यातही तुम्ही पौष्टिक पदार्थांवर अधिक भर देऊन गोड पदार्थ आणि तेलकट पदार्थ टाळण्याचा प्रयत्न करायला हवा.
कोणते अन्न खाऊ नये:-
ज्याप्रमाणे कोणते अन्न खायचे आहे हे आम्ही सांगितले त्याचप्रमाणे गोलो डाएटमध्ये कोणते अन्न खाणे टाळावे हे पाहणंदेखील गरजेचं आहे. तुम्हाला गोलो डाएट नियमित फॉलो करायचे असेल तर तुम्ही या गोष्टी आपल्या पदार्थांमध्ये समाविष्ट करणं शक्यतो टाळा. तुमचं वजन खूपच वाढलं असेल तर तुम्ही हा प्लॅन नक्की फॉलो करा आणि आपल्या वाढत्या वजनावर नियंत्रण आणा.